महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

 

सांगोला शहरातील नामंकित न्यू इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून (एसएससी) २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सर्व यशवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सन्मान सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा. अनिकेत देशमुख, न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने व कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थासचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर यांच्या शुभहस्ते पार पडला.

 

यावेळी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे, संस्था सदस्य प्रा.दिपकराव खटकाळे, पर्यवेक्षक दशरथ जाधव,तात्यासाहेब इमडे, प्रा. जालिंदर टकले, सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले, कार्यक्रम आयोजन प्रमुख स्मिता देशमुख तसेच गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात चैतन्य फुले यांनी प्रशालेतील गुणवंतांच्या यशाचा आढावा घेतला.

न्यू इंग्लिश स्कूल ने दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखत प्रशालेत कुमारी सानवी सुरेश गाडेकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक अदित्य विकास शिंदे तृतीय क्रमांक कुमारी वैष्णवी दिपक माने चतुर्थ क्रमांक प्रगती चंद्रकांत पाटील पाचवा क्रमांक प्रांजली प्रकाश गोडसे सहावा क्रमांक श्रेयश तानाजी गाडेकर सातवा क्रमांक समर्थ विनायक बाबर आठवा क्रमांक अदित्य संतोष जगताप मिळवला. त्याचबरोबर स्नेहा अण्णासो जाधव, कृष्णाई सुरेश पाटील, कल्याणी विजय राऊत, प्रथमेश दामोदर गायकवाड, श्रेयश सचिन बोराडे, प्रशांत दाजी लोखंडे, सावली हनुमंत गाडेकर, विश्वजीत नेताजी पाटील, सिद्धांत प्रशांत कांबळे, रूतुजा मारूती महांकाळ, श्रुती चंद्रकांत गुंगे व भाग्यश्री रामचंद्र घाडगे तसेच इयत्ता पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळविलेल्या कुमारी धनश्री दाजीराम माळी व विश्वजीत विकास गायकवाड या गुणवंतांचा सत्कार संपन्न झाला

यावेळी संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत भैय्या देशमुख म्हणाले की, या संस्थेची स्थापना सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. डॉ.आ गणपतरावजी देशमुख यांनी तालुक्यातील व परिसरातील गरीब, गरजू, शेतकरी, कष्टकरी विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी झाली आहे. या संस्थेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पालकत्वव स्वीकारून त्यांना या ठिकाणी उत्तम मार्गदर्शन केल्यामुळेच अशा काठीण्य पातळी असलेल्या परीक्षेमध्ये यश प्राप्त झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर म्हणाले की, शिक्षणाबरोबरच आपल्या जीवनाचा अर्थ कळला पाहिजे ही चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकल्याची लक्षणे आहेत. तुम्ही सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या फार मोठी परंपरा असलेल्या संस्थेचे विद्यार्थी आहात ही भाग्याची गोष्ट आहे. यापुढील काळात उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना आईवडिल आणि गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. आपली प्रतिमा आपल्यालाच निर्माण करावी लागते.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले यांनी केले तर आभार नेताजी पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button