महाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षेत नाझरा विद्यामंदिरचा एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 16 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले..*

*शिष्यवृत्ती परीक्षेत नाझरा विद्यामंदिरचा एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 16 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले..*

 

 

नाझरा (वार्ताहर):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नाझरा विद्यामंदिर प्रशालेने घवघवीत यश संपादन करत ग्रामीण भागात आपल्या गुणवत्तेचा ठसा कायम ठेवला आहे. इयत्ता आठवीचा विद्यार्थी आदर्श संजीव बाबर याने राज्याच्या गुणवत्ता यादीत तेरावा क्रमांक पटकावत नाझरा विद्यामंदिर ने राज्य गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम राखली आहे. पाचवी चे तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले तर आठवीचे 13 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

इयत्ता पाचवी स्कॉलरशिपचे जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढील प्रमाणे अनुष्का महादेव निंबाळकर ( जिल्हा गुणवत्ता यादीत 8 वी), कुमार .वेदांत अमर धायगुडे

( जिल्हा गुणवत्ता यादीत 305वा),ओंकार परमेश्वर पाटील

( जिल्हा गुणवत्ता यादीत 349वा) स्थान मिळवले आहे.

इयत्ता आठवीतील एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत व तेरा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

बाबर आदर्श संजीव याने ग्रामीण विभागातून राज्यात तेरावा क्रमांक मिळवला तर जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढील प्रमाणे बाबर सुशांत राजाराम(जिल्ह्यात दुसरा),आडसूळ मानसी संतोष(जिल्ह्यात 35),राऊत विराज विजय( जिल्हा 41),बंदवडे रामेश्वर मनोहर (जिल्हा 52), यादव सुरज बाळासाहेब(जिल्हा 63), काझी अलफाज फारूक (जिल्हा 107),कुमारी :पाटील वेदिका विजय (जिल्हा 193),शेळके मयूर प्रभू(जिल्हा 213),वलेकर रोहित बंडू (जिल्हा 228), पोरे सृष्टी विष्णू (जिल्हा 229), गोडसे ओम श्रीमंत (जिल्हा 238), बाबर श्रेयशी सुभाष (जिल्हा 243), बंदवडे सानिका संजय(जिल्हा 271) असे यश मिळवले आहे.

या विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षा विभाग प्रमुख वसंत गोडसे, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख दिलीप सरगर, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सुनील जवंजाळ, महालिंग पाटील,मंजुश्री ओतारी, अतुल बनसोडे, मारुती सरगर, लक्ष्मी कुकडे यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक बिभीषण माने, पर्यवेक्षक विनायक पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button