महाराष्ट्र

गुरूंचा अर्थ नव्याने समजून घेतला पाहिजे- प्रा.प्रबुद्धचंद्र झपके

सांगोला ( प्रतिनिधी) परंपरेप्रमाणे आपण गुरुपौर्णिमेदिवशी आपल्या आध्यात्मिक, धार्मिक गुरूंना वंदन करतो, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. पण या गुरूंच्या व्यतिरिक्त माणसाच्या जीवनात अनेक व्यक्तींने आपले जीवन उन्नत करण्यासाठी गुरु म्हणून मार्गदर्शन केलेले असते. शिकवण दिलेली असते अशा गुरूंचा नेहमीच आदर ठेवत गुरुंचा अर्थ नव्याने समजून घेतला पाहिजे. असे प्रतिपादन प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद,उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे पर्यवेक्षक प्रदिप धुकटे, उत्तम सरगर,काकासो नरूटे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला आद्यगुरु महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते झाले व संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे तैलचित्रास इयत्ता अकरावी नवागत विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळ सत्रात नववी ते बारावीतील व दुपार सत्रात पाचवी ते आठवीतील प्रातिनिधिक विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार केला. यावेळी प्रा.अर्चना कटरे, वसंत गुळमिरे यांनी गुरुमहात्म सांगितले. या कार्यक्रमासाठी उत्सव विभाग प्रमुख बापूसो सावंत, नरेंद्र होनराव,प्रा.तानसिंग माळी यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक उत्तम सरगर यांनी केले सूत्रसंचालन प्रा.माधुरी पैलवान,उन्मेष आटपाडीकर, प्रा.राजेंद्र कुंभार,चैतन्य कांबळे,संध्या तेली यांनी केले तर दत्तात्रय पाटील यांनी आभार प्रदर्शन केले


सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ इयत्ता अकरावी नवागत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक उत्तम सरगर,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे हस्ते गुलाब देऊन प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button