महाराष्ट्र

नाझरा विद्यामंदिर मध्ये विविध उपक्रमांनी गुरुपौर्णिमा साजरी

नाझरा(वार्ताहर):- नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून गुरूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व व्यासमुनींच्या प्रतिमेच्या पूजनाने संपन्न झाली. प्राचार्य बिभिषण माने,पर्यवेक्षक विनायक पाटील यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

 

त्यानंतर ओम तत्सत श्री व गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ही सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजन व शिक्षकेतर कर्मचारी यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. वेदश्री बनसोडे व राही देशपांडे यांनी कथक नृत्याच्या माध्यमातून गुरुवंदना सादर केली.शुभांगी नागरसे व संभाजी सरगर यांनी अभंगांचे गायन करून गुरु बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सुदर्शन माने यांनी अतिशय उत्कृष्टपणे तबला वाजवून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे नियोजन उत्सव भाग प्रमुख दीपक शिंदे यांनी केले तर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button