महाराष्ट्र

सहशिक्षिका स्मिता दिपक शिंदे /गायकवाड यांचा शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मान

जि. प. प्रा. शाळा बुंजकरवस्ती च्या सहशिक्षिका स्मिता दिपक शिंदे/गायकवाड यांचा रायझिंग ट्रायबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना अहिल्यानगर यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका गौरव पुरस्काराने सन्मान झाला आहे

प्रमुख पाहुणे माजी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे दिनकर टेमकर,शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद अहिल्यानगर दिलीप थोरे,वेतन अधीक्षक प्राथमिक अहिल्यानगर हेमंत साळुंके प्रशासनाधिकारी मनपा शिक्षणविभाग अहिल्यानगर जुबेर पठाण यांचे शुभहस्ते व सहसंचालक,प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे‌ रमाकांतजी काठमोरे यांचे अध्यक्षतेखाली .नगरसेवक अहिल्यानगर महानगरपालिका योगीराज गाडे,विशेष निमंत्रक स्वप्निल गायकवाड सरपंच कोंढापुरी शिरूर यांचे उपस्थितीत हॉटेल यश ग्रँड स्टेशन रोड अहिल्यानगर येथे रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ सकाळी ठीक ११:३० वाजता हा शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न झाला.

या समारंभासाठी रायझिंग ट्रायबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना अ. नगर सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

सहशिक्षिका स्मिता दिपक शिंदे/ गायकवाड यांचा यापूर्वी सांगोला तालुका पंचायत समिती आदर्श शिक्षिका, परिवर्तन सामाजिक संस्था राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका,सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशन आदर्श शिक्षिका, जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हास्तर सावित्रीची छाया आदर्श शिक्षिका,जुनी पेन्शन हक्क संघटना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका ,इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका, सांगोला तालुका को-ऑपरेटिव्ह सोसायटी आदर्श शिक्षिका पुरस्कार, सांगोला तालुका जिल्हा सोसायटी आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मान झाला आहे. या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button