निराधार महिलेस उदरनिर्वाहासाठी आपुलकी प्रतिष्ठानकडून शेळी भेट

सांगोला ( प्रतिनिधी )- शिरभावी ता. सांगोला येथील सुमन बंडगर या निराधार महिलेस उदरनिर्वाहासाठी आपुलकी प्रतिष्ठानकडून दोन पिलांची शेळी भेट देण्यात आली.

        शिरभावी येथील सुमन सीताराम बंडगर या ७२ वर्षीय आज्जी घरी एकट्याच असतात. काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले तर तीनही मुलीच असल्याने त्यांची लग्न होऊन त्या सासरी गेल्या. अशा परिस्थितीत वयाला झेपेल तेवढेच दुसऱ्याच्यात कामं करून त्या उदरनिर्वाह करतात. त्यांच्या या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने गरीबाची गाय समजली जाणारी शेळी त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रविवारी सकाळी शिरभावीच्या बंडगर वस्तीवर सुमन बंडगर यांना शेळी भेट देण्यात आली.
         याप्रसंगी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, प्रभाकर सरगर, सुरेशकाका चौगुले, अच्युत फुले, अरविंद डोंबे, प्रा.बाळासाहेब वाघमारे, प्रसन्न कदम, अमर कुलकर्णी, दत्तात्रय नवले, संदीप पाटणे, दत्तात्रय खटकाळे आदी सदस्य तसेच शरद कोळवले, समाधान नलवडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button