पाचेगाव बुद्रुकला आलाय महाबळेश्वरचा फील… निसर्गाचे उधाण: पर्यटकांची गर्दी 

 सांगोला तालुक्यातील प्रतिमहाबळेश्वर जाणवणारे पाचेगाव बुद्रुकमध्येही कोळे गावाशेजारी असलेल्या उंच डोंगर रांगा, पावसाळ्यातून वाहणारे लहान – मोठे झरे, डोंगरावर, घाटामध्ये असलेले झाडांचे घनदाट जंगल, डोंगराच्या पायथ्याशी असणारा तलाव व समोर डोंगरमाथ्यावर पवनचक्कींचे जाळे हे दृश्य पाहिले की निसर्गाची देण या भागाला मिळाली असे असे म्हणावे लागेल. गेल्या दोन-तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागाचा परिसर हिरवागार झाला असून या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला तर दुष्काळी सांगोला तालुक्यातील हे मोठे पर्यटन स्थळ म्हणून नावाला येईल. डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या गावाला पर्यटक भेटी देऊ लागले आहेत. हिरवळ पसरली वातावरण नवीन नयनरम्य बनले आहे असल्याचे दिसून येत आहे.
 सांगोल तालुक्याची ओळख ही दुष्काळग्रस्त तालुका, त्यातच माणखोऱ्यातील पर्जन्यछायेत असणारा प्रदेश अशी आहे. परंतु सांगोल्यापासून ४५ किलोमीटर कवठेमंकाळ पासून ३५ विट्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या  असलेल्या सांगोला तालुक्यातील  पाचेगाव बुद्रुक हे जणू महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळांमधीलच गाव आहे की काय असे वाटते. गावाच्या आजूबाजूला सर्वत्र पर्वत रांगांमुळे हे गाव डोंगर पाचेगाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध घाटामध्ये या डोंगर रांगांच्या अवतीभोवती निरनिराळ्या प्रकारची अनेक झाडे आहेत.
घाटामधून जाताना शेजारी घनदाट वृक्ष व नजरेस पडणारे मोठमोठ्या पवनचक्क्या. पावसाळ्यामध्ये या डोंगर रांगेतून अनेक लहान-मोठे वाहणारे झरे यामुळे पावसाळ्यात हा परिसर जणू आंबोली घाटाची जाणीव येथे होते. पावसाळ्यात या परिसरातून फिरताना हा तालुका दुष्काळी आहे का असाच प्रश्न डोळ्यासमोर पडतो. परंतु खरोखरच दुष्काळी तालुक्यातील पाचेगाव बुद्रुकचा परिसर पाहिला की येथेही जणू प्रती महाबळेश्वरच वसला आहे याची जाणीव होते. दुष्काळी सांगोला तालुक्यातही प्रति महाबळेश्वर सारखी जाणवणारे हे पाचेगाव बुद्रुक याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास झाला तर याकडे अनेक भागातून पर्यटक येऊ शकतील. तालुक्याच्या आमदारांनी गुवाहाटीचे येथील निसर्गाचे केलेले वर्णन संपूर्ण देशभर गाजले. परंतु  कोळागावा शेजारील डोंगर पाचेगाव मध्ये  गावात  या निसर्गाने समृद्ध असलेल्या, डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावाचा विकासासाठी सर्वार्थाने प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
ठळक बाबी –

– पावसाळ्यातील येथील नैसर्गिक सौंदर्य प्रतिमहाबळेश्वरचे दर्शन घडवते

– घाटामध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षक वनराई

– डोंगराच्या पायथ्याशी आकर्षक घानधरा तलाव

– डोंगरमाथ्यावर पवनचक्क्यांचे मोठे जाळे

– निसर्गाच्या खुशीतील या ठिकाणाचे पर्यटनाच्या दृष्टीने विकास हवा

* सांगोल्यातून  जाण्याचा मार्ग

 जुनोनी कोळा व डोंगर पाचेगाव

*कवठेमहांकाळ वरून जाण्याचा मार्ग नागज किडबिसरी डोंगर पाचेगाव

 *विटा शहरातून जाण्याचा मार्ग  खानापूर भिवघाट घाटनांद्रे पाटी डोंगर पाचेगाव

आमच्या डोंगर पाचेगाव परिसरातील निसर्गसौंदर्यामुळे संपूर्ण परिसर हिरवा गार झाला आहे जणू प्रति महाबळेश्वरच बनले आहे शासनाकडून निधी देऊन पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होणे गरजेचे आहे. यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल…
 ~ अमोल माने . युवक नेते पाचेगाव बुद्रुक
डोंगर पाचेगाव च्या घाटामध्ये हिरव्यागार, गर्द वनराईने नटलेल्या खोल दर्‍या, पक्ष्यांचा आवाज आणि वेडीवाकडी वळणे यावरून आपण निसर्गसौंदर्य अनुभवू शकतो. डोंगराच्या घाट माथ्यावर भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या
एका बाजूला उंच कडे आणि दुसर्‍या बाजूला हिरवळीची शाल पांघरलेल्या खोल दर्‍या मन मोहीत करतात. पर्यटनाच्या दृष्टीने शासनाने विचार करावा…
~ बाबासाहेब कांबळे, माजी सरपंच पाचेगाव बुद्रुक
 डोंगर पाचेगावातील  डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या घाणधरा तलाव लक्ष वेधून घेत आहे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रयत्नाने  १९७२ सालच्या दुष्काळात  रोजगार हमीतून घाण दरा तलावाची निर्मिती झाली तो तलाव जोरदार पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button