कोळा येथे राजमाता पसंस्थेच्या वतीने नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
राजमाता परिवाराने यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून कौतुकास्पद कार्य केले~ भाई गजेंद्र कोळेकर

कोळ्या सारख्या ग्रामीण भागात नावाजलेल्या गोरगरीब लोकांच्या हक्काच्या राजमाता पतसंस्था व परिवाराने नेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या श्रावण दादासो कोळेकर आकाश शहाजी पाटील, प्रेम प्रमोद पोरे पुनम बाबासो आलदर या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून पुढील शिक्षणासाठी अभ्यासासाठी ऊर्जा मिळणार असून राजमाता परिवाराने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे विचार संस्थेचे आधारस्तंभ माजी जिल्हा परिषद सदस्य भाई गजेंद्र कोळेकर यांनी व्यक्त केले.
कोळा ता सांगोला येथे राजमाता बिगर शेती सहकारी पतसंस्था व परिवाराच्यावतीने नेट परीक्षेत उत्तीर्ण यशस्वी मिळवल्याबद्दल भाई गजेंद्र कोळेकर यांच्या हस्ते व राजमाता परिवाराच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी मान्यवर नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र कोळेकर म्हणाले संस्थेचे चेअरमन कुंडलिक आलदर, व्हा चेअरमन नामदेव माने व संचालक मंडळाने राजमाता पतसंस्था परिवाराने गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे पाठीवर शाब्बासकीची थाप देऊन पेढे भरूवून कौतुक करून सत्काराचे आयोजन करून चांगले काम केले याचे मला समाधान वाटले. राजमाता पतसंस्था परिवार ग्रुप स्थापन करण्यामागे उद्देश अर्थ कारण नसून समाजकारण त्यातून राजकारण व शैक्षणिक सुभलता कशी प्राप्त होईल हा मूळ उद्देश आहे. पूर्वीच्या काळात कोळा परिसराची भागाची ओळख गोदी कामगाराचे गाव म्हणून असायची परंतु या नवीन पिढीने यशस्वी विद्यार्थिनी शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश मिळवून नाव मागे पडले याचे कौतुक वाटते. अनेक विद्यार्थ्यांनी सर्वच शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळवलेले आज विद्यार्थ्यांच्या रूपाने पाहायला मिळत आहे या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस ला प्रवेश घेत असताना न थांबता अनेक विद्यार्थ्यांनी एमबीबीएस करून सुद्धा आयएएस अधिकार एमपीसी क्लास वन अधिकारी झाले आहेत. तो सुद्धा दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी पार्श्वभूमी एवढीच आपल्या ग्रामीण भागात शैक्षणिक वातावरण सध्या चांगले तयार झाले आहे याचा आनंद होत आहे राजमाता परिवाराने सत्काराचा कार्यक्रम चांगला घेऊन सत्कार केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. शुभेच्छा देतो असे भाई गजेंद्र कोळेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास समाजसेवक रमेश कोळेकर पंच, चेअरमन कुंडलिक आलदर, व्हा चेअरमन जगन्नाथ माने, भाई रफिक तांबोळी प्रा मारुती सरगर,दादासाहेब कोळेकर, पत्रकार जगदीश कुलकर्णी, शहाजीराव पाटील, शहाजी हातेकर, काका पांढरे,ज्येष्ठ नेते शंकर आलदर, लोकसेवक ईश्वर घाडगे, सुभाष केंगार, उदय माळी, श्रीकांत कोळेकर,अण्णा कावळे, तुकाराम कुंभार, सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे, तानाजी सरगर, राजू पोरे, दादासो येडगे, तुषार पाटील दिनेश पाटील चैतन्य रुपनर सोमा शेटे,अनिकेत पोरे शंकर गोरड यांच्यासह आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी समाधान शिंदे, तात्यासाहेब हातेकर बाबासो गोडसे उमेश माळी पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड दयाप्पा आलदर आभार कुंडलिक आलदर यांनी मानले.