आदर्श मार्ग शोधण्याची मुख्य साधन नम्रता व चौकस बुद्धी- प्रा.डॉ.शालिनीताई कुलकर्णी

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची यशस्वीरित्या वाटचाल करण्यासाठी ध्येय चांगले शोधले पाहिजे, चांगला मार्ग शोधला पाहिजे मीपणा कमी केला पाहिजे .नम्रता व चौकस बुद्धी यांचा अवलंब करून जर मार्ग शोधला तर जीवनामध्ये मार्क कमी मिळू दे पण आदर्श माणूस नक्कीच घडला जातो व तेव्हा यशाची थाळी घेऊन देव सदैव पाठीशी उभा असतो. हा भगवद्गीतेतील श्लोकाचा दाखला माननीय डॉक्टर शालिनीताई कुलकर्णी यांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी बोलताना सांगितला.
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. त्यावेळेस व्यासपीठावर संस्थेच्या उपाध्यक्षा मा.माधवी देशपांडे मॅडम, माजी मुख्याध्यापिका भोसेकर मॅडम खडतरे मॅडम , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मागाडे मॅडम ,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर ,जनकल्याण अकॅडमी चे प्रमुख शेळके सर,उच्च माध्यमिक विभागाचे मार्गदर्शक ठोंबरे सर, पर्यवेक्षक मिसाळ सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली. नंतर भोसले मॅडम यांनी इयत्ता दहावीच्या यशस्वीरित्या वाटचालीचा व गुणाचा आलेख आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला .विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे शिक्षकांचे अभिनंदन करत असताना उत्कर्षचा विद्यार्थी हा पुस्तकी ज्ञान न घेता कौशल्य संपादन करणारे खणखणीत नाणे आहे असे मत व्यक्त केले. त्यानंतर जनकल्याण अकॅडमीचे प्रमुख शेळके सर यांनी अकॅडमी मार्फत घेतले जाणारे उपक्रम व आत्तापर्यंतचा अकॅडमी चा गुणवत्तेचा आलेख आपल्या मनोगतातून व्यक्त केला. विद्यार्थ्यांपैकी चि. सक्षम झोडगे,कु.सानवी गायकवाड व चि. प्रसाद पैलवान यांनी शाळे बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत शाळा व शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाची सांगता निशा बनसोडे मॅडम यांच्या आभार प्रदर्शनाने झाली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संचित राऊत सर यांनी केले. वरील कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावी शिक्षिका सौ भोसले मॅडम व सौ गंगथडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. वरील कार्यक्रमाला माध्यमिक विभागातील शिक्षक तसेच विद्यार्थी,विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.