न्यू इंग्लिश स्कूल चे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

यश कल्याणी सेवाभावी संस्था पुणे व सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मधील इयत्ता दहावीतील समृद्धी विष्णू माळी हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश प्राप्त केले असून तिची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली.
याबद्दल प्रशालेच्या प्रांगणात सत्कार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,संस्थासंचालक प्रा.डॅा.अशोक शिंदे,पर्यवेक्षक दशरथ जाधव, तात्यासाहेब इमडे,सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला नेताजी पाटील यांनी प्रास्ताविक करताना गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती दिली.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता नववी ते दहावीच्या गटात समृद्धी विष्णू माळी हिने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबद्दल तिचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी अनुज अनिल आदलिंगे याचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
.सदरच्या विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक पर्यवेक्षक दशरथ जाधव,श्रीरंग बंडगर,कोमल भंडारे,स्मिता देशमुख,वसंत आलदर,दिप्ती कुलकर्णी व मधुकर गेजगे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य फुले यांनी केले तर आभार प्रसिद्धीप्रमुख किरण पवार यांनी मानले.



