*सांगोला लायन्स क्लब समाजसेवेतील प्रकाशपर्व – माजी प्रांतपाल सुनील सुतार

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला लायन्स क्लबचे मार्गदर्शक माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या आचार विचारामध्ये समाजहित असल्याने लायन्स क्लब ऑफ सांगोलाकडून आजवर व लायन वर्ष २०२४-२५ मध्ये समाजाच्या हितासाठी झालेले मौलिक कार्य म्हणजे समाजसेवेतील प्रकाशपर्व आहे.असे प्रतिपादन माजी प्रांतपाल,माजी मल्टीपल कौन्सिल सचिव पी.एम.जे.एफ.ला.सुनील सुतार यांनी केले.सांगोला विद्यामंदिर, सांगोला येथे लायन्स क्लब ऑफ सांगोला ला.वर्ष २०२५-२६ नूतन पदाधिकारी शपथविधी व पदग्रहण समारंभ प्रसंगी पदप्रधान अधिकारी म्हणून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, रिजन चेअरमन ला.ॲड श्रीनिवास कटकुर, झोन चेअरमन ला.सोमशेखर भोगडे, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेष आटपाडीकर, सचिव ला.अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव उपस्थित होते.
पुढे बोलताना ला.सुनील सुतार यांनी सांगोला लायन्स क्लब कडून घेण्यात आलेली नेत्र शिबिरे त्यातून झालेल्या शस्त्रक्रिया, मार्गदर्शक प्रा.झपके सर यांच्या वाढदिवसानिमित्त हजारापेक्षा जास्त संख्येने होणारे रक्तदान शिबिर व क्लब कडून विविध क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर,पदाधिकारी व सदस्य यांचे कौतुक करत
ला.वर्ष २०२५-२६ नूतन अध्यक्ष ला.प्रा.नवनाथ बंडगर,सचिव ला.सुर्यकांत कांबळे,खजिनदार ला.मंगेश म्हमाणे व संचालक मंडळास पदाचे महत्त्व, जबाबदारीची जाणीव आपल्या विवेचनातून करून दिली व पदग्रहणाची शपथ दिली.
यावेळी रिजन चेअरमन ला.ॲड श्रीनिवास कटकुर , झोन चेअरमन ला.सोमशेखर भोगडे यांनी प्रांताच्या नियोजनानुसार राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमासाठी आवश्यक सहकार्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगत नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शक माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी लायन्समध्ये कार्यतत्परता दाखवली तर आपल्या कार्यामध्ये स्वर्ग निर्माण करता येईल असे सांगत झोकून देऊन काम करा.व समासेवेची उत्तुंग परंपरा कायम ठेवा असेच सांगत एका गोष्टीच्या माध्यमातून मौलिक प्रबोधन केले.
लायन वर्ष २०२४-२५ साठी प्रांत ३२३४ड१ कडून प्राप्त झालेले माजी प्रांतपाल सन्मानचिन्ह ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उत्कृष्ट कॅबिनेट ऑफिसर ब्लड डोनेशन कॅम्प कॅबिनेट ऑफिसर ला. प्रा. धनाजी चव्हाण, उत्कृष्ट ब्लड डोनेशन कॅम्प आयोजन लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर यांना प्रमुख पाहुणे ला.सुनील सुतार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले..
नूतन अध्यक्ष ला.प्रा.नवनाथ बंडगर मनोगत व्यक्त करताना प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला खूप चांगले कार्य करत आहे, या क्लबच्या अध्यक्षपदाचा पदभार घेताना मला मनस्वी आनंद होतो आहे असे सांगत आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब संघटना आणि त्यांचे कार्य नेहमी आपणास वेगळी अनुभूती देणारे आहे.यापुढे हे कार्य सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी कॅबिनेट ऑफिसर ला.उत्तम बनकर,ला.गिरीश नष्टे, संचालक ला.संजीव शिंदे,ला.सुहास होनराव,ला.शीलाकाकी झपके,ला.प्रा.अमर गुळमिरे, ला.डॉ,शैलेश डोंबे,ला.अच्युत फुले ,ला.प्रदीप चोथे,ला.हरिदास कांबळे,ला.प्राचार्य अमोल गायकवाड, डॉ.निकिता देशमुख, कुरुंदवाडचे ला.विजय जमदग्नी, सोलापूरचे ला.चंद्रकांत यादव,ला.स्वामीनाथ कलशेट्टी,ला.यतिन शहा, बंडगर, कांबळे, म्हमाणे परिवारातील सदस्य, कमलापूरमधील मित्रपरिवार,सांगोला लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली ला.प्रशांत रायचुरे यांनी वाचन केले.ला.उन्मेष आटपाडीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.ला.प्रा.प्रसाद खडतरे यांनी सचिवांचा अहवाल सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कॅबिनेट ऑफिसर ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रथम उपाध्यक्ष ला.प्रा.शिवशंकर तटाळे यांनी केली तर आभार नूतन सचिव ला.सूर्यकांत कांबळे यांनी केले.



