तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत लक्ष्मीदेवीचे यश….

सोनंद(प्रतिनिधी) शिक्षण विभाग, जि. प. सोलापूर, सांगोला तालुका इंग्रजी टीचर असोसिएशन व यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंद मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश खेचून आणले आहे.
इ. 6 वी मधील प्रांजल राहुल पाटील हिने इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावून ट्रॉफी, मेडल व प्रशस्ती पत्रक मिळविले आहे. अमृता महिपती बोराडे हिने उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रक मिळविले आहे.
इ. 7 वी मधून वैष्णवी मनोहर गायकवाड हिने सदर स्पर्धेत तालुक्यात द्वितीय, आराध्या अमोल गायकवाड हिने तृतीय क्रमांक मिळवून ट्रॉफी, मेडल व प्रशस्तीपत्रक पटकाविले आहे.
वरील इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत तालुका स्तरावर घवघवीत यश मिळविल्याबद्दल संस्था अध्यक्ष मा. बाबासाहेब भोसले, सचिव मा. आनंदराव भोसले, संस्था सदस्या सौ. अनिता भोसले, सौ. रजनी भोसले, मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महाकाळ, पर्यवेक्षक प्रा. सुभाष आसबे, सौ. सुषमा ढेबे,सौ. अर्चना बाबर तसेच सर्व शिक्षक स्टाफने अभिनंदन केले आहे.



