शिवसेना प्रवक्तेपदी प्रा.लक्ष्मण हाके

सांगोला (प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना प्रवक्तेपदी प्रा.लक्ष्मण सोपान हाके यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.प्रा.हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत.

धनगर समाजातील अभ्यासू चेहरा म्हणून प्रा.लक्ष्मण हाके यांची राज्यभरात ओळख आहे.आक्रमक वक्तृत्व शैलीमुळे त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मा.आ.महादेव जानकर आणि आ.गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केल्याने माढा, बारामती, सांगली लोकसभा मतदारसंघात प्रा.लक्ष्मण हाके यांचा मोठा फायदा शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) होऊ होऊ शकतो. प्रा.हाके यांनी मागील वर्षभरात अनेक ओबीसी मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.त्याचप्रमाणे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या वेशात जाऊन लक्षवेधी आंदोलनही केले होते
या निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे