कारचालकाने दुचाकीस उडवले …दुचाकीस्वार जागीच ठार
सांगोला (प्रतिनिधी):-भरधाव कारने दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी मयत झाल्याची घटना शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर रोजी रात्री 9वा च्या सुमारास काळूबाळूवाडी, जुनोनी ता. सांगोला येथे घडली आहे. संजय कोळेकर असे अपघातात मरण पावलेल्या इसमाचे नाव होय.
संजय कोळेकर हे रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरून आरेवाडी येथे निघाले असता मिरज कडून भरधाव येणार्या कारने जोराची धडक दिल्याने संजय कोळेकर हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाल्याची घटना घडली आहे तर अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे याबाबत मनोज कोळेकर यांनी अज्ञात कारचालका विरुद्ध पोलिसात पुन्हा दाखल केला आहे.