एटीएम कार्डची अदलाबदल करुन 4 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक
सांगोला (प्रतिनिधी):- स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला येथे पैसे भरायला गेलेल्या इसमाचे एटीएम कार्ड अदलाबदल करून एटीएम मधून 4 लाख 85 हजार 452 परस्पर पैसे काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
28 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बाबासाहेब शेळके हे सांगोला येथील एसबीआय सांगोला बँकेचे एटीएम मशीन मध्ये पैसे भरण्यासाठी गेले असता पाठीमागे रांगेत उभारलेल्या 2 अज्ञात इसमांनी शेळके यांना एटीएम मशीन मध्ये पैसे भरण्यासाठी मदत करण्याचे बहाण्याने त्यांचे एटीएम कार्डचा पिन नकळत पणे माहिती करुन घेवुन एटीएम कार्डची आदलाबदल करून घेवुन खात्यावरून परस्पर एटीएमचा वापर करून 4 लाख 85 हजार 452 रुपये काढून घेतले आहेत व फसवणुक केली आहे याबाबत बाबासाहेब शेळके यांनी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.