राजकीयसांगोला तालुका

नुकसानग्रस्त पिकांची पहाणी‌ झाली ..पंचनामे‌ झाले..पण‌ मदत‌ केंव्हा मिळणार- डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख‌

सांगोला:- सरकारे येतात व जातात परंतु योग्य धोरणाचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल..त्यामुळे आता पाहणी ,पंचनामे हे झाले असतील किंवा राहीलेले करायचे असतील तर करुन घ्या व आधी आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी‌ पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी केल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली..

संपुर्ण राज्यांमध्ये काही भागात सरासरी पेक्षा जास्त पाऊस‌ झाला‌ आहे.अशा अवेळी व प्रमाणापेक्षा जास्त पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके नाहीशी झाली आहेत.काही जिल्ह्यांमध्ये प्रमाणापेक्षा कमी पाऊस पडला आहे.त्यामुळे‌ कमी पाऊसाचा फटका‌ काही पिकांना‌ बसला आहे.आशा निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी‌ व शेतीवर‌ आवलंबुन असलेले मजुर यांना फार‌‌ मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
या‌ वर्षी तर‌ पाऊसामुळे पिकांचे फार‌ मोठे‌ नुकसान झाले आसुन राज्य सरकारचे मंत्री..विरोधी पक्षाचे नेते हे आपली जबाबदारीने समजुन‌ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत..व‌ शेतकऱ्यांना बांधावरती जाऊन दिवासा‌ देत आहेत.सरकारने काही भागाची नुकसानीची पाहणी केली आहे तर काही भागाची पहाणी करायची आजुन बाकी आहे.परंतु शेतकऱ्यांना आर्थिक मदत केंव्हा मिळणार..
शेतकरी हा‌ बळीराजा‌ आहे मग राजाचं आर्थिक अडचणीत आला तर जनता जनार्दनाच काय होणार प्रत्येक जण भाषणात शेतकऱ्यांचा कानवळा दाखवतात तो दाखवलाही पाहीजे परंतु फक्त ‌बोलुन व वरवरचा कानवळा दाखवुन शेतकरी सुखी समाधानी होणार नाही.तर सरकारने ज्यांच्या ‌पिकांचे नुकसान झाले आहे,फळबागांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत दिली गेली पाहिजे.
‌ शेतकरी आर्थिक संकटात सापडला तर शेतीवरती आवलंबुन आसलेले‌ मजुर लहान लहान व्यवसायीक हे सुध्दा आर्थिक अडचणीत येत असतात.केंद्र सरकार‌ असो की राज्य सरकार असो मोठमोठ्या उद्योग पतींना सढळ हाताने मदत करीत असतात व ती मदत सतत झालेली अनेक उदाहरणे आहेत परंतु शेतकऱ्यांना मदत करताना मात्र सरकारे सतत चालढकल करताना दिसत आहेत.
स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब व स्व एन डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‌कायम आवाज उठवत आसत.आबासहेब तर‌ विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सतत अभ्यासपूर्ण पद्धतीने आवाज उठवत होते. व राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे.. सध्या सभागृहात काय वातावरण -माहोल असतो हे सर्व जनता टि.व्हि वरती बघता असते असो..परंतु‌ शेतकरी वाचवायचा असेल टिकवायचा असेल तर सरकारने कायमस्वरुपी उपाययोजना केल्या पाहिजेत.
उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजेच तर‌ शेतकरी अडचणीत येणार‌ नाही.
जर‌ का‌ शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला तर‌‌ एखाद्या ‌दुसऱ्या वर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे नुकसान ‌झाले तर शेतकरी सहन करु शकतो ती ताकत शेतकरी बांधवांमध्ये आहे ‌परंतु शेतकऱ्यांबाबतची उदासीनता ठोस धोरणाचा अभाव या मुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणे‌‌ हे सरकारचे काम आहे -जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!