महाराष्ट्र

फीनिक्स संकुल प्रशालेतील . विद्यार्थ्यांनी गाजवले वक्तृत्व स्पर्धेत यश

महुद बु॥: फीनिक्स संकुलमधील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या महुद बृहत विकास सेवा सोसायटी यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. वक्तृत्व कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘महुद बृहत विकास सेवा सोसायटी’ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेमध्ये ‘त्यांनी ठेवलेल्या वयोगटानुरूप विषयावर विद्यार्थ्यांनी आपली मते प्रखरपणे मांडली. फीनिक्स संकुलचे लहान गट 3 री ते 4 थी गटातून नंबर आलेले विद्यार्थी

1) युवराज रामचंद्र गोवंधरे – प्रथम क्रमांक 2) गंधाली संदीप पांढरमिसे – द्वितीय क्रमांक 3) स्वराज कृष्णदेव कोळेकर -उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक 4) त्रिशा मोहन कोळेकर- उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक.

त्याचप्रमाणे: लहान गट -इयत्ता पाचवी ते सातवी गट – 1) निवेदिता संतोष मेटकरी- प्रथम क्रमांक 2) श्रद्धा बंडू आटपळकर -द्वितीय क्रमांक 3) आलिया आलताफ तांबोळी – उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

इयत्ता ८ वी ते १० वी गट : नंबर पुढील प्रमाणे – 1) अनुष्का रमेश देवकते- प्रथम क्रमांक 2) सोनाली तानाजी सरगर – उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक तसेच

मोठा गट 1 1 वी ते 1 2: 1) मोनाली नवनाथ मेटकरी- प्रथम क्रमांक 2) साक्षी सुधीर पवार- तृतीय क्रमांक

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष – श्री . पांडुरंग येडगे सर तसेच तिन्ही प्रशालेच्या मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे, तर इतर कलांमध्येही आपले कौशल्य सिद्ध केले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.”

या यशामागे विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालक व प्रशाला या सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button