महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सुरुवातीला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज चे प्राचार्य प्रा.केशव माने यांच्या हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक दशरथ जाधव, तात्यासाहेब इमडे सर,सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले,जेष्ठ शिक्षक औदुंबर कांबळे,माणिक देशमुख,वैशाली घोडके आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना नेताजी पाटील म्हणाले की, अण्णा भाऊ साठे हे समाजसुधारक व लेखक होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० मध्ये झाला . त्यांचे मूळ नाव तुकाराम होते .त्यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही. जेमतेम दुसरीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. हे समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते. त्यांनी अनेक कथा, कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले. अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली.

 

यानंतर सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम म्हणाल्या की,लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला.लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथेच गेले.देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले.भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे १ ऑगस्ट १९२० रोजी आजारपणामुळे निधन झाले.
सदरच्या कार्यक्रमाचे नेताजी पाटील यांनी केले तर शेवटी आभार सचिन हजारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button