सावे माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

सावे माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री. प्रकाश शेजाळ यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना सांगितली.तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री. बर्गे सर यांनी करिअर मार्गदर्शन याविषयी माहिती सांगितली. जीवनामध्ये अनेक करिअरच्या वाटा कशा आहेत याचे सखोल मार्गदर्शन त्यांनी आपले मनोगतातून केले.
तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर यांनी ‘विकसित भारत ,’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. विद्यालयातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपली मते उत्स्फूर्तपणे मांडली. त्याचप्रमाणे विद्यालयातील श्री. मेटकरी सर व अनुसे सर यांनीही उद्योजकाविषयी अनेक उदाहरणे देऊन सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देऊन तशाप्रकारे आपणही भविष्यात बनण्यासाठी प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बर्गे सर उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. गावडे सर यांनी केले.



