रक्ताचा तुटवडा असल्याने सामाजिक संस्थांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा – सोमेश यावलकर

सांगोला (प्रतिनिधी): राज्यात मलेरिया, डेंग्यूच्या वाढत्या आजारामुळे रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राजकीय, सामाजिक संस्था, विविध सेवाभावी संस्था यांनी छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करून रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशनचे अध्यक्ष तथा रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी केले आहे.
राज्यात रक्तदानाच्या बाबतीत सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे. कोरोनाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढ्यांनी मोठ्या प्रमाणात राज्यात रक्ताचा पुरवठा केला. तसेच अनेक सामाजिक, राजकीय, सेवाभावी संस्थांनी रक्तदान करण्याची मोहीम चालवली आहे. सध्या मलेरिया, डेंग्यूच्या वाढत्या आजारामुळे रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. सर्वच रक्तपेढ्यांमध्ये कमी प्रमाणात रक्तसाठा असल्याने रक्तदात्यांनी आणि आयोजकांनी रक्तदान करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सोलापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशनचे अध्यक्ष, तथा रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी केले आहे.
मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदात्यांनी आणि रक्तदान शिबीर आयोजकांनी पुढाकार घेऊन रक्तसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सोलापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशनचे अध्यक्ष तथा रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी केले आहे.