सांगोला तालुका

नूतन चेअरमन डॉ.प्रभाकर माळी यांचा चैतन्य हास्य योग्य मंडळ तर्फे सत्कार संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या चेअरमनपदी डॉ.प्रभाकर माळी यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांचा चैतन्य हास्य योग मंडळच्यावतीने उपाध्यक्ष झिरपे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चैतन्य हास्य योग मंडळ अध्यक्ष जगताप सर यांनी प्रास्ताविक करताना डॉ.माळी यांच्या निष्ठेचे व आजपर्यंत च्या कामगिरीचे हे फळ असल्याचे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सध्या सूतगिरणी ची अपेक्षा अतिशय बिकट असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सूत गिरणी चालविण्याचे आव्हान नूतन चेअरमन यांना मिळाले असून त्यावर मात करून सांगोला सहकारी सूत गिरणीच्या पुन्हा नव्याने वैभव प्राप्त होईल, असा आशावाद झिरपे सर यांनी त्यांना शुभेच्छा देताना व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना डॉ माळी यांनी सूत गिरणीचा तोटा कमी करून ती प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. सत्काराबद्दल कृतयता व्यक्त करून त्यांनी हास्य योग मंडळला 10 हजार रुपयांची देणगी दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार सुरू असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले
सेवानिवृत्त शिक्षक अरविंद डोंबे यांनी आभार प्रदर्शन करताना माळीनगर येथील शाळेतील आठवणी सांगून जुन्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमात गणेश मंदिर व कार्यलयाचे संचालक ह भ प माऊली उर्फ किसन इंगोले यांनी डॉ.माळी यांचा सत्कार करून इंगोले परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम साठी ह.भ.प बाळासाहेब तेली, हेमंत तेली, म.श.घोंगडे, बाबुराव लाडे, अशोक जाधव, राजेंद्र ठोंबरे, मिलिंद पतंगे, सुधीर दौडे आदि सदस्य उपस्थित होत.े

One attachment • Scanned by Gmail

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!