सांगोला तालुका

सामाजिक संस्थांनी वंचित घटकांच्या आर्थिक विकासाबरोबर शैक्षणिक विकासासाठीही पुढे येण्याची गरज-कबीर गायकवाड

अंटलास कॉपकोच्या सहकार्याने अस्तित्वसंस्थेच्या वतीने विधवा महिलांना शेळ्या व शिलाई मशीनचे वाटप

सांगोला(प्रतिनिधी):-अंटलास कॉपको इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने अस्तित्व संस्थेच्या वतीने भूमिहीन व अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठीभूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी विकास कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमांतर्गत काल शिवशक्ती मल्टीपर्पज हॉल येथे सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील निवडक वीस महिलांना शेळ्या व पंधरा महिलांना शिलाई मशिन चे वाटप अटलास कॉपको इंडिया लिमिटेडचे कॉर्पोरेट एच.आर.प्रमुख कबीर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अटलास कॉपको इंडिया लिमिटेडचे सी एस आर मॅनेजर अभिजित पाटील, अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे, अरुण कसबे, अ‍ॅड.सुनिता धनवडे, जितेंद्र जगधने यांच्यासह विविध गावचे सरपंच, सदस्य प्रकल्पातील विविध गावाचे शेतकरी, महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या या वाटप कार्यक्रमात कबीरजी गायकवाड बोलत होते.


भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी विकास कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांसाठी सेंद्रिय शेती, कोरडवाहू फळबाग लागवड व संगोपन, परसबाग लागवड इत्यादी विषयांवर आतापर्यंत अनेक कार्यशाळा संपन्न झाल्या आहेत. तसेच अल्पभूधारक शेतकर्‍यांना शेती व्यवसायासाठी मदत केली जात असून आंबा लागवडीला प्रोत्साहन दिलं जात आहे. या प्रकल्पाच्या कामाचा आढावा ही या कार्यक्रमांत घेण्यात आला.
अस्तित्वचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांनी प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा मांडला. त्यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी तसेच आतापर्यंत झालेल्या कामाची माहीती दिली.
सुरुवातीला अस्तित्वच्या कार्यकर्त्यांनी आम्ही प्रकाशबीजे रुळवीत चाललोहे जागृती गीत गाऊन कार्यक्रमाची सुरूवात केली. रामा मोरे, शंकर गडहिरे या लाभार्थी शेतकर्‍यांनी प्रकल्पाच्या कामातील अनुभव मांडले. कार्यक्रमांत भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी विकास प्रकल्पाच्या पुस्तिकेचे तसेच अस्तित्व संस्थेच्या सन 2021-22 या आर्थिक वर्षातील अहवालाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
सूत्रसंचलन दिपाली भुसनर व सागर लवटे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण सुर्यागध, मारूती गरंडे, दिलशाद सय्यद, नितीन वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार सागर लवटे यानी मानले.

कोरोना नंतरचा काळ सर्वांसाठीच कठीण असुन सध्या आपल्या भागांतील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे.डाळिंबाच्या जात असलेल्या बागांमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी आज अतिवृष्टीमुळे जास्तच अडचणीत आला आहे. अशा कठीण काळात आम्ही किमान छोट्या शेतकर्‍यांना तसेच विधवा महिलांना काहीशी मदत व्हावी म्हणून भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी विकास प्रकल्प हाती घेतला असुन या प्रकल्पाच्या माध्यमातून आनेक छोटे शेतकरी तसेच विधवा महिलांना आधार मिळत आहे. अनेक विधवा महिलांनी घर काम करीत शिवण काम व्यवसाय सुरू केले आहेत.
श्री.शहाजी गडहिरे,सामाजिक कार्यकर्ते व अध्यक्ष अस्तित्व संस्था

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!