महाराष्ट्र

क्रांतीज्योती महिला पतसंस्थेचे काम प्रेरणादायी.. – आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

नाझरे शाखेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):-क्रांतीज्योती महिला पतसंस्थेने नाझरे ता. सांगोला येथील शाखेत प्रथम वर्धापन दिनानिमित्त महिला व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन चांगला उपक्रम राबविला व त्यामुळे पतसंस्थेचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे मत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आरोग्य शिबिरात व्यक्त केले. तसेच साठ वर्षाच्या वरील नागरिकांचे अँजिओग्राफी व अन्जोप्लास्टीक आपण मोफत करणार असल्याची घोषणा ही आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी केली. अध्यक्षस्थानी डॉक्टर धनंजय गावडे हे होते.

सुरुवातीस महात्मा फुले व सावित्रीबाई फुले तसेच स्व. आबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सत्यनारायण पूजा श्री व सौ सुखदेव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सर्व मान्यवरांचे संस्थापक रामचंद्र बनकर, सीईओ गणेश माळी, चेअरमन सौ. भाग्यश्री बनकर, व्हाईस चेअरमन सौ. दिपाली चंद्रकांत बनकर व मार्गदर्शक सीए उत्तम बनकर यांच्या शुभहस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तर शिबिराचे उद्घाटन डॉक्टर विजय सरगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

सदर प्रसंगी तज्ञ डॉक्टर विजय बंडगर, डॉक्टर राजेंद्र जानकर, डॉक्टर सुहास ढोबळे, डॉक्टर सुधीर ढोबळे, डॉक्टर महेश राऊत, डॉक्टर अर्चना खडतरे, डॉक्टर चंद्रकला बाबर, डॉक्टर हरिश्चंद्र सोनवणे, डॉक्टर ज्योती पाटील, बिरुदेव गडदे, अक्षय शेंडगे, विजय बंडगर, सोनाली भोसले, मनीषा ढोबळे, मा. उपसभापती सुनील चौगुले, शिक्षक नेते अशोक पाटील, पत्रकार रविराज शेटे, गोरख भाऊ आदाटे, शिवाजी सरगर, सिताराम बनसोडे, पांडुरंग वाघमारे, शिवाजीराव निंबाळकर, समीर मुलानी, सागर वाघमारे, महेश वाघमारे, ब्रह्मदेव बोराटे, मदन रायचुरे, बाळासो चौगुले, हनुमंत होनमाने, सल्लागार कोंडीबा वाघमारे, डॉक्टर बाळासो धायगुडे, अजित अडसूळ, चंद्रकांत बनकर, सर्व संचालिका, सभासद, नागरिक, महिला, कर्मचारी वर्ग, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सल्लागार सुनील बनसोडे यांनी तर आभार शाखाधिकारी तुषार बनकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button