महाराष्ट्र

स्व.आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक शिक्षक समिती सांगोला यांच्या वतीने रक्तदान व रक्त तपासणी शिबिर संपन्न

सांगोला: सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आमदार स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती उपशाखा सांगोला यांच्या वतीने रक्तदान व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी बोलताना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी प्राथमिक शिक्षक समितीच्या कार्याचे कौतुक केले. सर्व महिला शिक्षकांकरिता दर सहा महिन्यातून रक्त तपासणी शिबिर आयोजित करावे. 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी सर्व्हायकल कॅन्सर वरील HPV चे मोफत लसीकरण, तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अँजिओग्राफी व गरजेनुसार एन्जोप्लास्टी  मोफत देण्याचाही मानस आहे. याबाबत संघटनेने पुढाकार घेऊन  काम करावे अशी सूचनाही त्यांनी केली. संघटनेच्या प्रत्येक कार्यात आपण खंबीरपणे सोबत राहू असे आश्वासन दिले.

माधवबाग थायरोकेअर यांच्या सहकार्याने 73 प्रकारच्या रक्त चाचण्या माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या शिबिरामध्ये 65 शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांनी रक्त तपासणी करून घेतली.

रक्तदान शिबिरात 54 रक्तदात्यांनी पवित्र असे रक्तदान केले. रेवनील ब्लड सेंटर सांगोला यांनी याकामी अनमोल असे सहकार्य केले.सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सांगोला येथे शिबिर पार पडले.

    कार्यक्रमासाठी सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button