शिवणे वार्ताहर–महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह तसेच सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कै. डॉ.आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांची जयंती तालुक्यात विविध कार्यक्रमानी साजरी होते त्याचे औचित्य साधून शिवणे माध्यमिक विदयालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध स्पर्धा आणि कार्यक्रम घेण्यात आले.
त्यामध्ये गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7वी, इयत्ता 8 वी ते 10 वी आणि ज्युनिअर विभाग या तीन गटात घेण्यात आल्या यामध्ये तीन गटात मिळून एकूण 27 स्पर्धकांनी भाग घेतला.
शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळ सत्रात वरील तीन गटाप्रमाणेच निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच दुपार सत्रात रक्षाबंधनानिमित्त राखी बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेची संकल्पना प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांची होती तर सविता कचरे,पल्लवी सातपुते ,प्रियांका सरक यानी स्पर्धकाना मार्गदर्शन केले.
10ऑगस्ट रोजी संस्था अध्यक्ष बाबनरावजी जानकर, उपाध्यक्ष प्रकाशभाऊ वाघमोडे, प्राचार्य विजयकुमार वाघमोडे ,शिक्षक स्टाफ आणि विध्यार्थी यांच्या उपस्थितीत कै. आमदार डॉ.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
घेतलेल्या स्पर्धामधून प्रथम, द्वितीय,तृतीय आणि उत्तेजनार्थ असे नंबर काढले आहेत त्यांचा बक्षीस वितरण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांनी दिली आहे.