फॅबटेक ज्युनिअर कॉलेजमध्ये कृषी दिन उत्साहात साजरा..

 

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषि दिन हा कृषीप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. त्यामुळे कृषी दिनाला विशेष असे महत्त्व आहे.  राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मेजर सुभेदार श्री झुंजार मागाडे, प्रगतशील शेतकरी श्री पोपट इमडे व श्री. ज्ञानेश्वरी इमडे लाभले तसेच या कार्यक्रमास फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर वर्षा कोळेकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने केली. कॉलेजचे प्राचार्य यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. मेजर सुभेदार झुंजार माघाडे सर यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शेती विषयक माहिती दिली तसेच कृषी संस्कृती जपण्याचे आवाहन देखील केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.  अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कुमारी प्राप्ती दादासाहेब आलदर हिने केले व आभार प्रदर्शन कुमारी अपूर्वा यलमार हिने व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button