उत्कर्ष विद्यालयाचे विविध स्पर्धेत घवघवीत यश

स्व.आ.डॉ.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित तालुकास्तरीय लोकनृत्य, वक्तृत्व, रंगभरण स्पर्धेमध्ये उत्कर्ष विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
लोकनृत्य स्पर्धेत इ.१ ते ४ च्या गटात उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाच्या इ.४ च्या विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषा सहित आदिवासी नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच रंगभरण स्पर्धेमध्ये इ.४ च्या पृथ्वीराज राहुल बुंजकर, सौम्या महेश बाबर, यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच पूर्वा सचिन बनसोडे हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.
वक्तृत्व स्पर्धेत इ.८ ते १० गटात उत्कर्ष माध्यमिक विद्यालयातील इ.८ वी मधील विद्यार्थिनी स्नेहल विलास जानकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. लोकनृत्य गाण्याचे दिग्दर्शन शिक्षिका पुनम भाकरे व शिक्षक मुरलीधर चौरे यांनी केले.
या सर्वांचे कौतुक संस्थेच्या अध्यक्षा नीलिमाताई कुलकर्णी, डॉ.संजीवनीताई केळकर, शालिनीताई कुलकर्णी, वसुंधराताई कुलकर्णी व तसेच माध्यमिकचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विश्रांती मागाडे ताई व उपमुख्याध्यापिका स्वरालीताई कुलकर्णी आणि पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका संध्याताई शास्त्री यांनी केले.



