महाराष्ट्र

कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप संपन्न. 

जवळे(प्रशांत चव्हाण) कृतज्ञता प्रतिष्ठान जवळे यांच्याकडून कै. सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले-सरकार ज्युनिअर कॉलेज जवळे या प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या एकल पालक असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्कूल बॅग व गणवेश इ.शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रशालाचे प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर,उपमुख्याध्यापक श्री.प्रशांत गोरे सर व जेष्ठ अधिव्याख्याते श्री.ए.जी. गायकवाड सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या प्रशालेचे इयत्ता दहावीच्या 2008 च्या बॅचचे माजी विद्यार्थी आकाश साळुंखे,नेहल व्हनकट्टे,विकास कदम,सतीश आगलावे,सचिन साळुंखे व अतुल ठोकळे यांनी कृतज्ञता प्रतिष्ठानची स्थापना केली.समाजाच्या उपयोगी वेगवेगळे उपक्रम या प्रतिष्ठानच्या वतीने राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून प्रशालेत गरजू एकच पालक असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

 

प्रथम विद्यालयाच्या वतीने प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.प्रशालेप्रति कृतज्ञता व्यक्त करताना प्रशालेचे प्राचार्यश्री.बाळासाहेब शिंदे,उपमुख्याध्यापक श्री.प्रशांत गोरे सर व ज्येष्ठ अधिव्याख्याते श्री.ए.जी.गायकवाड सर यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रतिष्ठानचे सदस्य नेहल व्हनकट्टे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आम्ही या प्रशालेचे माजी विद्यार्थी असून आम्हाला या प्रशालेने घडवले त्याबद्दल प्रशालेचे व गुरुजनांचे आम्ही आभारी आहोत. या प्रशालेबद्दल आम्हाला आदर असून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवीत आहोत.

 

शेवटी प्राचार्य शिंदे सर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की हे सर्व आमचे माजी विद्यार्थी असून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. त्यांच्याकडून जास्तीत जास्त चांगले समाज उपयोगी उपक्रम व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विजय लांडगे सर यांनी केले तर आभार श्री.तानाजी तोडकर सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button