महाराष्ट्र

आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयात गोकुळाष्टमी संपन्न….

आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयात गोकुळाष्टमी चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम दहीहंडीचे पूजन श्रीम. सुलेखा केदार मॅडम् यांनी केले.
त्यानंतर बाळ गोपाळांनी थरावर थर लावून दहीहंडी फोडली आणि जल्लोषात गोविंदा आला रे आला या गजरात मुलांनी ताल धरला.

 

श्रीकृष्णाची पारंपरिक गाण्यावर मुलींनी टिपरी नृत्य सादर केले. श्रीकृष्ण , राधा व गवळण यांच्या वेशभूषेत सर्व विद्यार्थी आले होते. श्रीकृष्णाच्या भूमिकेत प्रतिक फुले व राधाच्या भूमिकेत भक्ती लिंगे होते.यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दिपक वाघमोडे सर ,कु.कुदळे मॅडम्, सौ, मयुरी राऊत मॅडम्, सौ. जयश्री वाघमोडे मॅडम्,सौ.शितल माळी मॅडम्,श्री, मयुर सुरवसे सर ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button