महाराष्ट्र

जवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये 79 वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

जवळे (प्रशांत चव्हाण) विद्या विकास मंडळ जवळे संचलित कै. सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेमध्ये 79 वा भारताचा स्वातंत्र्य दिन शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी संस्थाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या सूचनेनुसार प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी कोळेकर गौरी कुमार हिच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने ध्वजास मानवंदना दिली.

 

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष आणि तंटामुक्त अध्यक्ष श्री. अरुण भाऊ घुले-सरकार,मा.सरपंच सौ.सुषमाताई घुले-सरकार सरपंच श्री.सज्जन मागाडे,उपसरपंच श्री.नवाज खलिफा,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर,उपमुख्याध्यापक श्री.प्रशांत गोरे सर सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिष्ठित व्यापारी,नागरिक युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button