महाराष्ट्र

फीनिक्स प्रशालेत गोकुळ अष्टमी उत्साहात साजरी

महुद बु॥: फीनिक्स प्रशालेत गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सकाळी १०:०० वाजता श्रीकृष्णाच्या मूर्तीची आकर्षक सजावट करून पूजा करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कृष्ण आणि राधाच्या वेशभूषा करून नृत्ये सादर केली. पारंपरिक गाण्यांवर आधारित नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रशालेच्या प्रांगणात “दहीहंडी”चा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता, ज्यात विद्यार्थ्यांनी मानवी मनोरा व लेझीम नृत्य सादर करून करून दहीहंडी फोडली. या वेळी ‘गोविंदा आला रे आला’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाचे आयोजन, प्रशालेचे शिक्षक श्री येडगे सर यांनी केले व त्याचबरोबर श्री गावित सर श्री लिंगडे सर, श्री कोळेकर सर, क्षीरसागर मॅडम, कांबळे मॅडम,महापुरे मॅडम,बाजारे मॅडम, उबाळे मॅडम यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत केली. प्रशालेचे प्राचार्य यांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील मूल्यांवर प्रकाश टाकला आणि सहकार्य, एकता, आणि निष्ठा यांचे महत्त्व ही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्याचबरोबर प्रशालेतील अध्यक्ष श्री येडगे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल धन्यवाद दिले.

हा कार्यक्रम केवळ मनोरंजनाचा भाग नव्हता, तर भारतीय संस्कृती आणि परंपरांची माहिती नव्या पिढीला देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल होते. विद्यार्थ्यांनी या उत्सवाचा आनंद घेतला आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button