महाराष्ट्र

भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन सांगोला नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात साजरा* 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या प्रांगणात नगर परिषदेचे मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ सुधीर गवळी यांचे हस्ते सकाळी 7.45 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी आपल्या देशाची सेवा केलेल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

 

दिनांक 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत नगरपरिषदेकडून विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. देशभक्तीपर आधारित रांगोळी स्पर्धा व राखी बनविण्याची स्पर्धा यामध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांना मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ सुधीर गवळी यांचे हस्ते बक्षिस देण्यात आले. रांगोळी स्पर्धेचे विजेते प्रथम क्र. – अनुश्री महेश खुळपे, द्वितीय क्र. – तेजश्री लक्ष्मण रणदिवे, तृतीय क्र. ऋचिता मनोजकुमार पाटील, उत्तेजनार्थ – मनीष मनोजकुमार पाटील

*राखी बनविणे स्पर्धा* विजेते प्रथम क्र.- नागिन मनोज कुमार पाटील, द्वितीय क्र.- स्मिता आप्पासाहेब लेंडवे, तृतीय क्र.- अमृता अनिकेत तेली, उत्तेजनार्थ – स्वाती रेवणसिद्ध पाटील

 

स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी यावेळी सांगोला नगर परिषदेचे माजी नगरसेवक, माजी सैनिक, नागरिक, पत्रकार, सांगोला नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button