महाराष्ट्र

एलकेपी मल्टीस्टेट आणि सूर्योदय परिवाराच्या वतीने स्वातंत्र्यदिनी 1800 विद्यार्थी आणि तब्बल साडेआठ हजार शिक्षकांचा एकाच वेळी सन्मान 

सांगोला महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये विस्तार असलेली आणि शेतकरी, व्यापारी , नोकरदार, व्यावसायिक तसेच उद्योजक यांच्या आर्थिक गरजांसाठी सदैव तत्पर असलेली एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी त्याचबरोबर सूर्योदय अर्बन आणि सूर्योदय फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला महत्त्वाचा टप्पा असलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दुसरा महत्त्वाचा टप्पा असलेली इयत्ता बारावी. या दोन्ही परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या त्या प्रशालेतील सर्व अध्यापकांना देखील गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

 

सहकाराची जाण, सामाजिक कार्याची आवड असलेले दीर्घोद्योगी व्यक्तिमत्व उद्योगरत्न अनिलभाऊ इंगवले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून सूर्योदय या नावाने उद्योग समूह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असून वित्तीय क्षेत्रामधील या समूहाचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून कर्नाटकातील अथणी पर्यंत आणि कोल्हापूर पासून मराठवाड्यापर्यंत या समूहातील अव्वल दर्जाची संस्था असलेल्या एल के पी मल्टीस्टेटचा शाखा विस्तार असून प्रत्येक शाखेद्वारे आर्थिक व्यवहाराबरोबरच व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी देखील जपली जाते. बँकेच्या विविध शाखांच्या परिसरातील सुमारे सात ते आठ विद्यालयांची निवड करून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये संबंधित शाळांमधील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना स्वातंत्र्य दिन कार्यक्रमांमध्ये सन्मानित करण्यात आले.

 

एकाच वेळी दोन राज्यातील तीनशे शाळांमधील 1800 विद्यार्थी आणि सुमारे साडेआठ हजार शिक्षकांना सन्मानित करून तब्बल एक लाख 17 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत खूप व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी जपणारा कदाचित हा राज्यातील पहिलाच उपक्रम असावा. सूर्योदय परिवाराचे प्रमुख असलेले इंगवले यांनी सन 2010 साली जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ बंडोपंत लवटे आणि सुभाष दिघे गुरुजी या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सूर्योदय उद्योगाची सुरुवात केली. एल के पी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन आणि सूर्योदय महिला अर्बन यासारख्या आर्थिक संस्थांबरोबरच सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल तसेच डॉ बंडोपंत लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्योदय दूध विभाग कार्यरत असून यामुळे हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध झालेले आहे. संस्था, उद्योग आणि व्यवसायाची वाटचाल एका बाजूला सुरू असताना सांस्कृतिक फेस्टिवल, अनेकविध प्रकारची आरोग्य शिबिरे, दुष्काळ निवारण कार्यासाठी प्रयत्न, रक्तदान शिबिरे, अन्नदान सेवा आणि पर्यावरणाचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवडीकरिता विशेष मोहीम

अशा अनेक उपक्रमांद्वारे व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी या उद्योग समूहाने जपलेली आहे. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाचे निमित्ताने सूर्योदय व एलकेपी परिवाराने घेतलेला व्यापक स्वरूपातील गुणीजनांच्या सन्मानाचा हा उपक्रम म्हणजे एक अनोखा विक्रमच असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या उपक्रमासाठी एलकेपी मल्टीस्टेट आणि सूर्योदय अर्बन संस्थांमधील सर्व कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button