नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये गणरायांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.”गणपती बाप्पा मोरया- मंगलमूर्ती मोरया” “आला रे आला गणपती आला” अशा प्रकारच्या घोषणा देत सर्व विद्यार्थ्यांनी नाझरा येथील मुख्य चौकातून गणरायाचे स्वागत केले. त्या ठिकाणी विधिवत पूजा करून गणरायाला वाजत गाजत प्रशालेच्या प्रांगणात आणण्यात आले.
प्रशालेमध्ये मुख्याध्यापक बिभिषण माने,पर्यवेक्षक विनायक पाटील, विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील यांच्या उपस्थितीत गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर आरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले. शुभांगी नागरसे यांच्याकडून गणरायाची मूर्ती देण्यात आली.पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थी व ढोल ताशांच्या गजरात गणरायाची प्रचंड उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.