महाराष्ट्र

जवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये श्री.गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना.

जवळे (प्रशांत चव्हाण) कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले- सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळा या प्रशालेत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषात श्री.गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.प्रारंभी प्रशालेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या लेझीम ग्रुपने गावातील मेन चौक सम्राट चौक, कोष्टी गल्ली,मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या निवासस्थानी पुढे जुनी चावडी व मुख्य बाजारपेठेतून हे विघ्नहर्ता बाप्पा विघ्नहर्ता,गणनायका गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि,आया देखो आया बाप्पा मोरया,मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया,देवा तुझ्या दारी आलो.या श्रीगणेशाच्या गीतावर अप्रतिम   असे लेझीम नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.तसेच विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी विविध देवदेवतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा देत श्री.ची मूर्ती प्रशालेत आणली यावेळी जवळे गावात  वातावरण भक्तीमय झाले होते.
जुनी चावडी येथे प्रशालेतील उपमुख्याध्यापक श्री.प्रशांत गोरे  सर यांच्या हस्ते तर प्रशालेत ज्युनिअर कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री.ए.जी. गायकवाड सर यांच्या शुभ हस्ते श्री.गणेशाची आरती  संपन्न झाली.त्यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना चिरमुर,फुटाणे शेंगदाणे मिक्स असणारा प्रसाद दिला. सदरचा कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी प्रशालेतील प्राचार्य,उपमुख्याध्यापक,सांस्कृतिक विभाग सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button