महाराष्ट्र

दिल्लीचेही तख्त राखीतो सांगोला माझा

*सांगोला विद्यामंदिरचा एनसीसी कॅडेट ओम हंबीररावची दिल्ली थलसेना कॅम्पसाठी निवड*

सांगोला (वार्ताहर) सप्टेंबर 2025 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या थलसेना कॅम्पसाठी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील एनसीसी कॅडेट सार्जंट ओम लक्ष्मण हंबीरराव याची निवड झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत या स्पर्धेमध्ये तो सहभागी होत आहे.

सन 2022 पासून सलग चार वर्ष सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि दिल्ली यांचं एक वेगळंच नातं निर्माण झालेले आहे .38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर अंतर्गत सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये एनसीसी विभाग कार्यरत असून एनसीसी ऑफिसर मकरंद चंद्रशेखर अंकलगी यांनी सक्षमपणे या विभागाची धुरा 2013 पासून सांभाळलेली आहे.

ऑल इंडिया थलसेना कॅम्पमध्ये ज्युनियर डिव्हिजनचे कॅडेट रायफल शूटिंग मधून दिल्ली येथे जाण्याची सुरुवातच सांगोला विद्यामंदिरच्या एनसीसी कॅडेटमुळे  2022 पासून या सुवर्णकाळाला सुरुवात झाली ती सलग चार वर्षे अविरतपणे सुरू आहे.

2022 मध्ये तीन एनसीसी कॅडेट दिल्ली येथे रायफल शूटिंग मधून आपले कौशल्य दाखवून एक दीपस्तंभ बनले, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन  2023, 2024  व 2025 सलग चार वर्षे सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे कॅडेट दिल्ली पादाक्रांत करीत आहेत. आत्तापर्यंत 38 महाराष्ट्र बटालियन मधून सलग चार वर्षे ज्युनिअर डिव्हिजन मधून दिल्ली गाठणारे सर्व आठ कॅडेट  सांगोला विद्यामंदिर प्रशालेचेच आहेत.

सन 2025 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्पसाठी सार्जंट ओम लक्ष्मण हंबीरराव याचे सिलेक्शन झाले आहे औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, मुंबई ए, मुंबई बी ,नागपूर ,अमरावती, अहमदनगर, अशा एकूण आठ ग्रुप मधून सिलेक्शन होऊन आलेल्या 140 कॅडेट पैकी फक्त आठच कॅडेट रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये दिल्लीसाठी सिलेक्ट झाले आहेत.

 प्रतिकूल परिस्थितीशी मात देऊन एका शेतकरी कुटुंबातील हा छोटा जवान आपल्या मध्ये असणाऱ्या उत्तुंग नेमबाजीचे कौशल्य दाखवून 02 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर यादरम्यान संपूर्ण भारतातील एनसीसी  कॅडेट विविध स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्ली येणार आहेत. यामध्ये सार्जंट  ओम लक्ष्मण हंबीरराव महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत या स्पर्धेत सहभागी  होणार आहे.

चार वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या एनसीसी विभागाला संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांचे सहकार्य लाभले.

ओम हंबीरराव याला रायफल शूटिंगसाठी एनसीसी ऑफिसर मकरंद अंकलगी व उज्वला कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

सार्जंट ओम हंबीरराव यांच्या निवडीबद्दल त्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर चे कमांडिंग ऑफिसर एम.डी. मुथ्थप्पा , ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर देवानंद, लेफ्टनंट अरुण कुमार ठाकूर , सुभेदार विक्रम सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था सदस्य विश्वेश झपके, प्रशालेचे प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, पर्यवेक्षक उत्तम सरगर, प्रदीप धुकटे  व काकासाहेब नरूटे सर्व विद्यामंदिर परिवारातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button