उत्कर्ष विद्यालयात संस्कृत श्लोक स्पर्धा संपन्न

सांगोला :- शनिवार दिनांक 12 .11 .2022.रोजी उत्कर्ष विद्यालयात संस्कृत श्लोक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताद्वारे विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी ,इंग्रजी या विषयांबरोबरच संस्कृत विषयाची गोडी लागावी व श्लोक पाठांतर व्हावे या उद्देशाने संस्कृत भारती सुभाषित पठन- स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या श्लोक स्पर्धेसाठी सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे संस्कृतचे शिक्षक श्री. उन्मेश आटपाडीकर सर. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सुनील कुलकर्णी सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विश्रांती मागाडे बाई, पर्यवेक्षक मिसाळ सर हे उपस्थित होते.
सदरच्या स्पर्धेमध्ये एकूण ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सदरची स्पर्धा ही गट पहिला – इयत्ता तिसरी चौथी, गट दुसरा-इयत्ता पाचवी ते सातवी व गट तिसरा-इयत्ता आठवी ते दहावी या गटानुसार घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे अर्थासह श्लोक सादरीकरण केले.वरील स्पर्धेचे परीक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे संस्कृत शिक्षक श्री उन्मेष आटपाडीकर सर यांनी केले .
वरील स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
गट पहिला- इयत्ता तिसरी ते चौथी- प्रथम क्रमांक- कु.निसर्ग फुले- इयत्ता चौथी ,द्वितीय क्रमांक- प्रेम हागरे- इयत्ता चौथी ,व तृतीय क्रमांक -कुमारी ज्ञानदा जांगळे.
गट दुसरा- इयत्ता पाचवी ते सातवी-प्रथम क्रमांक -कुमारी वैदेही देशपांडे इयत्ता सातवी, द्वितीय क्रमांक- कुमार ओम पडळकर इयत्ता सातवी,तृतीय क्रमांक- कुमारी गायत्री कचरे इयत्ता सातवी ,व कुमारी श्रावणी शिर्के इयत्ता सहावी यांना विभागून प्राप्त झाला.
इयत्ता आठवी ते दहावी गटामधून प्रथम क्रमांक -ऋषी पैलवान- इयत्ता नववी,द्वितीय क्रमांक- वेदांत गडदे- इयत्ता नववी, तृतीय क्रमांक- कुमारी स्वरश्री देशपांडे -इयत्ता आठवी हिने प्राप्त केला.
वरील सर्व मुलांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे, सर्व मुलांना विद्यालयाच्या संस्कृत शिक्षिका- रेखा भिंगार्डे , व शुभांगी कवठेकर.यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा माननीय. सौ. संजीवनी ताई केळकर , मान्यवर पदाधिकारी तसेच तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.