सांगोला विद्यामंदिर प्रशालेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

सांगोला(प्रतिनिधी): सांगोला विद्यामंदिर प्रशालेची सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सहल दिनांक १२/११/२०२२ व १३/११/२०२२ या दोन दिवसात संपन्न झाली.यामध्ये नरसोबाची वाडी,खिद्रापूर,बाहुबली गार्डन, पन्हाळा,ज्योतिबा मंदिर, महालक्ष्मी मंदिर,रंकाळा तलाव, शाहू पॅलेस,टोप संभापूर येथील गंधर्व वॉटरपार्क,आरवडे येथील राधाकृष्ण मंदिर,इत्यादी ठिकाणी भेट दिली.
सदर शैक्षणिक सहलीसाठी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील इयत्ता ५ वी ते ७ वी मधील २४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला,तर विद्यार्थ्यांसोबत १६ शिक्षक या सहलीमध्ये होते.
नरसोबाची वाडी येथील श्री दत्त मंदिर पाहून खिद्रापूर येथील पौराणिक हेमाडपंती मंदिर तसेच बाहुबली गार्डन विद्यार्थ्यांनी पाहिले.यानंतर पन्हाळा गडावर जाऊन तेथील ऐतिहासिक माहिती प्राप्त करून घेतली व तेथून ज्योतिबा मंदिर येथे ज्योतिबाचे दर्शन घेतले. ज्योतिबा मंदिर येथे संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे माजी सचिव मा.प्रफुल्लचंद्र झपके साहेब यांची भेट झाली.त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमुराद संवाद साधला व पुढील सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सहल मुक्कामी टोप संभापूर येथे मार्गस्थ झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन रंकाळा तलाव पाहिला,त्यानंतर शाहू पॅलेस मधील ऐतिहासिक वस्तू विद्यार्थ्यांनी पाहिल्या यानंतर टोप संभापूर येथील गंधर्व वॉटर पार्क मध्ये विद्यार्थ्यांनी पोहण्याचा तसेच विविध गेम्सचा मनमुराद आनंद घेतला व शेवटी येताना तासगाव आरवडे येथील राधाकृष्ण मंदिराचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला.
सदर सहलीसाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष, सचिव, सहसचिव, कार्यकारिणी सदस्य, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक,सहल विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहल यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.