महाराष्ट्र

राज योगी रंगनाथ स्वामी प्रतिष्ठान तर्फे नारी शक्तीचा सन्मान अंतर्गत 53 नारीशक्तीचा सन्मान संपन्न…

राजयोगी रंगनाथ स्वामी प्रतिष्ठान नाझरे ता. सांगोला येथे गणेश उत्सव कार्यक्रमात नारी शक्तीचा सन्मान अंतर्गत विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या 53 नारी शक्तीचा शाल, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन भव्य सन्मान करण्यात आला त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माता बालक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सौ. संजीवनी ताई केळकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी, उद्योगपती उल्हास धायगुडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे, मार्केट कमिटी संचालक बंडू मामा आदाटे, महात्मा फुले प्रतिष्ठान अध्यक्ष शिवाजीराव बनसोडे, पत्रकार रविराज शेटे, जगदीश कुलकर्णी, अतुल फसाले, अमर तांबोळी इ. उपस्थित होते. सुरुवातीस मंडळाने आजवर कर्तुत्वान माता तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले व यावर्षी सन्मान नारी शक्तीचा आम्ही मंडळातर्फे साजरा करतोय व यामध्ये महिलांचा कर्तुत्वान विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सत्कार करताना आम्हास आनंद होत आहे असे ओंकार देशपांडे यांनी सांगितले. तर अन्याय, अत्याचार प्रसंगी हाक द्या भाऊ म्हणून साथ देऊ असे उद्योगपती उल्हास दादा धायगुडे पाटील यांनी यावेळी सांगितले.
तर गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी व डॉ. संजीवनी ताई केळकर यांनी नारीशक्तीचा सन्मान हा उपक्रम मंडळाचा कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी सत्कार मूर्तीच्या वतीने शिक्षिका नयना पाटील यांनी मत व्यक्त केले. तसेच खालील महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे, डॉ. नीता जोंधळे, डॉ, चंद्रकला बाबर, डॉ. ज्योती पाटील, डॉ. गौरी पाटील, डॉ. प्रियंका बनसोडे, प्राचार्य यास्मिन मुल्ला, तलाठी के एन दौंड, रूपाली कांबळे, फार्मसी मोनाली सरगर, ग्रामसेवक मनीषा जावीर, शिक्षिका नयना पाटील, सौ भारती बनसोडे, सौ. योगिता शेटे, सौ. कस्तुरा जांभळे, सौ. सुनिता गोडसे, सौ. नंदादेवी बनसोडे, श्रीमती लता पाटील, सौ. नंदा गाडेकर, सौ. सुजाता बनसोडे, सौ. माधुरी जोंधळे, सौ. राजश्री कुळलोली, सौ. कविता बनसोडे, अंगणवाडी सेविका कल्याणी सुतार, सविता बनसोडे, सौ. जयश्री रायचुरे, निकिता सुतार, सौ. तुळसाबाई सरगर, कल्पना घोडके, प्रभावती वाघमारे, सुनिता जावीर, नंदा बनसोडे, मंगल हरिहर, राणी वाघमारे, रेखा सरगर, बाई वाघमारे, शिक्षिका भारती दौंड, शारव्वा कुल्लोली, कस्तुरा पाटील, संगीता वाघमारे, पुनम दबडे, दिपाली स्वामी, सुनिता भिवरे, आरोग्य सहाय्यिका भारती भोसले, कविता शेटे, कोमल भंडारे, मीरा कोरे, प्रगती दंडवते, सुवर्णा चौगुले, मीनाक्षी रोकडे, कल्पना खंडागळे, धनश्री सरगर, बाळाबाई ढोबळे इ. महिलांना गौरवण्यात आले आहे. सदर प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व आभार सौ. स्वरा देशपांडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa