महाराष्ट्र

सौ.कविता शिंदे मॅडम यांचा सन्मान नारी शक्तीचा या पुरस्काराने सन्मान

राजयोगी श्री रंगनाथ स्वामी प्रतिष्ठान नाझरे यांच्या वतीने देण्यात येणारा २०२५ चा सन्मान नारी शक्तीचा हा पुरस्कार नुकताच सांगोला शहरातील नामांकित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेजच्या सौ.कविता शिंदे मॅडम यांना नुकताच नाझरे येथे दिमाखदार समारंभात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा.डॅा. अशोकराव शिंदे यांच्या शुभहस्ते प्रशालेत मोठ्या उत्साहात करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज चे प्राचार्य प्रा.केशव माने,संस्था संचालक प्रा.दिपकराव खटकाळे,प्रा.जयंत जानकर,पर्यवेक्षक दशरथ जाधव , तात्यासाहेब इमडे, सांस्कृतिक प्रमुख सौ.स्मिता इंगोले, जेष्ठ शिक्षक औदुंबर कांबळे, माणिकराव देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थासंचालक डॅा. अशोकराव शिंदे म्हणाले की, सौ. कविता शिंदे या गेली २० वर्षे मराठी विषयाचे अतिशय चिकाटीने अध्यापन करत असून त्यांनी कायम विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. त्याच बरोबर त्यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सुद्धा आपला सक्रिय सहभाग नोंदवला असल्याने त्यांचा सन्मान नारी शक्ती चा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
आपल्या सत्कार समारंभावेळी बोलताना सौ. कविता शिंदे मॅडम म्हणाल्या की, माझ्या आजच्या या सन्मान नारी शक्ती चा या पुरस्कारात सर्वात मोठा वाटा हा न्यू इंग्लिश स्कूल परिवाराचा असून मला याचा सार्थ अभिमान आहे. तसेच आजपर्यंतच्या या वाटचालीत माझे आई, वडिल, पती, मुले या सर्वांचेही मोलाचे योगदान आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली खडतरे यांनी केले तर शेवटी आभार सांस्कृतिक प्रमुख सौ.स्मिता इंगोले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button