महाराष्ट्र

गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोहानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

सांगोला (प्रतिनिधी ) थोर स्वातंत्र्यसेनानी,सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या.स्मृतीसमारोहानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता इयत्ता आठवी ते दहावी, इयत्ता अकरावी व बारावी या गटासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे व बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सदर वक्तृत्व स्पर्धेचे विषय,बक्षीसे व इतर नियमावली संदर्भात संपूर्ण माहिती संस्थेच्या www.stspm.org या वेबसाईटवरती दिली आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धा नाव नोंदणीसाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe0IVrTCWHA_kwXT_mh5covATazCR27C2USEtnMfudGQ6ZQ9w/viewform?usp=header
या गुगल लिंगचा वापर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड यांनी केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button