महाराष्ट्र

सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे येत्या रविवारी आयोजन

सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी , सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या तिन्ही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार दिनांक सात सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले असल्याची माहिती या सर्व संस्थांचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.

 

सांगोला शहरातील मिरज रोडवर असलेल्या सदानंद मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सूर्योदय महिला अर्बन च्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेमधील विजेत्यांचे बक्षीस वितरण देखील करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी अनिलभाऊ इंगवले दिली. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सहभागाबद्दल आकर्षक भेटवस्तू देखील यावेळी देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी , कष्टकरी , पशुपालक तसेच छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक, शासकीय नोकरदार त्याचबरोबर होतकरू तरुणांसह समाजातील सर्व घटकांच्या आर्थिक गरजांसाठी प्राधान्याने धावून जाणारी आर्थिक संस्था असायला हवी. हा लोकहितवादी विचार करून दूरदृष्टीने जनमानसाची नेमकी नाळ ओळखणारे अनिलभाऊ इंगवले यांनी आपले सहकारी मित्र जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ बंडोपंत लवटे आणि सुभाष दिघे गुरुजी यांना सोबत घेऊन या सर्व संस्थांची उभारणी अत्यंत तळमळीने केलेली आहे. सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधांसह सेवाभावी वृत्तीचा कर्मचारी वृंद आणि विविध प्रकारचे उपक्रम त्याचबरोबर ठेवीवरील आकर्षक व्याजदर यामुळे या संस्था नावारुपास आलेल्या असून ठेवीदाराच्या ठेवींचे संरक्षण आणि शंभर टक्के कर्ज वसुली ही या संस्थांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

 

महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेल्या एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची ही बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा असून सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची आठवी तर सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. या कार्यक्रमासाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले सर्व स्पर्धक तसेच तीनही संस्थांचे सर्व सभासद बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, सूर्योदय अर्बन महिला चेअरमन सौ अर्चना अनिल इंगवले तसेच व्हाईस चेअरमन अनुक्रमे सुभाष दिघे गुरुजी आणि सौ ज्योती जगनाथ भगत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button