क्रीडा

मुंबई इंडियन्सला मिळाला नवीन प्रशिक्षक, अंबानी यांनी संघाला दिली नवी `पाॅवर`

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदासाठी आता एका दिग्गज खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे. आकाश अंबानी यांनी जेव्हा ही घोषणा केली तेव्हा सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. कारण मुंबई इंडियन्समध्ये यापूर्वी खेळलेल्या दिग्गज खेळाडूलाच आता प्रशिक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्समध्ये आता मोठे बदल होत आहेत. किरॉन पोलार्डने आयपीएममधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याचबरोबर आता मुंबईच्या संघाने सात खेळाडूंना आपल्या ताफ्यात कायम ठेवले आहे. त्याचबरोबर १२ खेळाडूंना आता संघाबाहेर केल्याचेही समोर आले आहे. मुंबईच्या संघात एवढे मोठे बदल होत असताना आता त्यांनी प्रशिक्षकपदाचीही घोषणा केली आहे.

 

गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाला दारुण पराभव पत्करावे लागले होते. पण आता पुढच्या हंगामात मात्र दमदार कामगिरी करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने आता आपल्या प्रशिक्षकांमध्ये काही बदल करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कायरन पोलार्डची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा आकाशा अंबानी यांनी केली.

 

आकाश अंबानी म्हणाले की, ” पॉलीने मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू म्हणून मोठा वारसा मागे ठेवला आहे. प्रत्येक वेळी तो मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांनी गर्जना केली. आमच्या कुटुंबातील एक मौल्यवान सदस्य आणि एक चांगला मित्र, ज्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीमध्ये अत्यंत वचनबद्धतेने आणि उत्कटतेने क्रिकेट हा खेळ सुंदर केला, त्याला निरोप देणे नक्कीच योग्य नाही. त्यामुळे पोलार्डने निवृत्ती घेतली असली तरी तो मुंबई इंडियन्सचा कायम एक भाग असेल. कारण आता आम्ही पोलार्डला मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त करत आहोत.”

 

मुंबईच्या संघाने बाहेर काढलेल्या संभाव्य खेळाडूंची यादी
मुख्यतः किरॉन पोलार्ड, फॅब एलन आणि टायमल मिल्स यांची नावे जाहीर झाली असली तरी, याशिवाय अनमोलप्रीत सिंग, मोहम्मद अर्शद खान, मयंक मार्कंडेय, संजय यादव, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, आकाश मधवाल, राहुल बुद्धी आणि मुरुगन अश्विन यांची नावे प्रसिद्ध झाली नाहीत, पण त्यांच्या या यादीमध्ये समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले संभाव्या खेळाडू…
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स आणि टीम डेव्हिड आणि इशान किशन या खेळाडूंच्या नावांचा उल्लेख केला जात आहे ज्यांना मुंबई इंडियन्स संघ आयपीएलसाठी कायम ठेवू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!