महाराष्ट्र

लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगोले वस्ती झाली ‘डिजिटल’

सांगोला: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगोले वस्ती (सांगोला) या शाळेत राबवले जाणारे उपक्रम  व शाळेची प्रगती पाहून शालेय परिसरातील शिक्षणप्रेमी व पालक यांनी शाळेची गरज ओळखून लोकसहभागातून दुसऱ्या  अँड्रॉईड टीव्ही साठी 28630 रुपये वर्गणी गोळा केली. सदर रक्कमेतून सेलकोर  कंपनीचा 43 इंच टीव्ही खरेदी करण्यात आला.

   दिनांक 8 सप्टेंबर रोजी टीव्हीचे लोकार्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी शालेय परिसरातील शिक्षणप्रेमी,पालक  व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य  उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री चतुरगुण औताडे सर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या कामकाजाबद्दल माहिती दिली  व  सौ निकम मॅडम यांनी शाळेला सढळ हाताने नेहमीच मदत करणाऱ्या पालकांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button