महाराष्ट्र
विद्यापीठ स्तरीय शोधनिबंध स्पर्धेत मतीन खतीब दुसरा

येथील सांगोला महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी मतीन रफीक खतीब याने विद्यापीठ स्तरीय शोधनिबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी त्याचे अभिनंदन केले.
सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद आणि टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने ‘वाढती लोकसंख्या आर्थिक विकासास तारक की मारक’ या विषयावर शोधनिबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मतीन खतीब यांनी ‘भारतातील लोकसंख्या वाढीचे आर्थिक विकासावरील परिणाम’ या विषयावर शोधनिबंध सादर करून यश संपादन केले.त्यास अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.वेदपाठक एम. डी.,प्रा.सौ.भुंजे एस. एस., प्रा. गोडसे पी.डी. यांनी मार्गदर्शन केले.



