महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिरच्या गणेशोत्सवाचे पहिले पुष्प वाद्यवादन स्पर्धेने संपन्न; *सिद्धी शिर्के प्रथम, ऋषिता ढोले द्वितीय*

*सांगोला (वार्ताहर) विविध कलांचा अधिपती श्री गणेशोत्सवानिमित्त पहिले पुष्प गुंफताना सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे वाद्यवादन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये कुमारी – सिद्धी धनाजी शिर्के प्रथम क्रमांक, कुमारी – ऋषिता सचिन ढोले द्वितीय क्रमांक आणि कुमारी – स्वराली सुनील केदार तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.यावेळी संबळ, हलगी, पियानो, हार्मोनियम यासारख्या विविध वाद्यांच्या गजरात स्पर्धकांनी श्री गणेशाची आराधना करत उपस्थित विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे, उत्सव विभागाचे नरेंद्र होनराव, सांस्कृतिक विभाग प्रमुख नागेश भोसले उपस्थित होते.परीक्षक म्हणून मकरंद अंकलगी, अमोल महिमकर, प्रशांत रायचुरे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन आशितोष नष्टे यांनी तर आभार संध्या तेली यांनी मानले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



