महाराष्ट्र

माणगंगा परिवाराच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सामाजिक जीवन जगत असताना पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दीपस्तंभाचे कार्य करत असतात. चुकलेल्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्यदेखील शिक्षक करत असतात. सामाजिक जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोठे असल्याचे मत माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भरत शेळके यांनी व्यक्त केले.

माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वतीने सेवानिवृत झालेल्या शिक्षकांच्या सेवापुर्ती कार्यगौरव आणि माजी सैनिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भरत शेळके, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब केदार, माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले, माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या चेअरमन अर्चना इंगोले, व्हा.चेअरमन सुखदेव रंदवे, संचालक सचिन इंगोले, विवेक घाडगे, अरुण सुरवसे यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सांगोला तालुक्यातील सेवानिवृत्त झालेले शिक्षक, शिक्षिका आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भरत शेळके म्हणाले की, बालपणापासून मुलांवर संस्कार करणाऱ्या आई वडील आणि त्यानंतर मुलांना घडविणारे मूर्तिकार म्हणजेच शिक्षक होय. विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची मोठी जबाबदारी असते. ही जबादारी शिक्षकांनी प्रमाणिकपणे पार पाडल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल घडू शकते. सेवानिवृत्त शिक्षकांनी आणि माजी सैनिकांनी समाजकार्यात वाहून घेत सामाजिक बांधिलकी जोपासावी असे मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते तात्यासाहेब केदार सावंत म्हणाले, सेवानिवृत्त शिक्षकांनी सामाजिक कार्यात सक्रियपणे योगदान द्यावे. त्यांनी आपल्या अनुभवांचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा. शिक्षकांनी अनेक पिढ्या घडविल्या असे सांगितले.
यावेळी बोलताना माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले म्हणाले की, शिक्षकांचे सामाजिक कार्यातील योगदान खूप महत्वाचे आहे. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाहीत, तर ते चांगले नागरिक घडवण्यातही मदत करतात. शिक्षकाचे कार्य हे समाजाला दिशादर्शक असून उद्याची पिढी घडविण्यासाठी शिक्षक कायम प्रयत्नशील असतात. अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं असते. अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून जाऊन देशाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी झटत असतात. वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असणाऱ्या शिक्षकांनी आपलं आयुष्य ज्ञानदानासाठी खर्ची करावे. सेवानिवृत्त शिक्षकांनी एकत्र यावे आणि आपलं आरोग्य जपत शिक्षणाच्या कार्याला वाहून घ्यावे असे आवाहन माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले यांनी केले. यावेळी बंडोपंत येडगे, रमेश पवार, सुनीता खंकाळ यांनी आपल्या मनोगत मानगंगा परिवार अर्बन बँकेच्या उपक्रमाचे कौतुक करून बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे संचालक विवेक घाडगे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणगंगा परिवाराच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


यावेळी माणगंगा परिवाराचा वतीने सेवानिवृत शिक्षक औदुंबर गव्हाणे, आप्पाराव धांडोरे, बंडोपंत येडगे, हेमंत रायगावकर, मच्छिंद्र इंगोले, मनोहर राऊत, संजय भोसले, प्रदीप पाटील, राजेंद्र माने, रघुनाथ काटे, नानासो गोडसे, मोहन लवटे, सुरेश सावंत, अंकुश गोरे, सहदेव ऐवळे, स.बा.काझी, राजाराम बनसोडे, राजाराम तेली, दगडू चौगुले, दीपक शिरदाळे, हरिदास भोसले, भीमराव काटे, मधुकर धायगुडे, पांडुरंग बाबर, मुरलीधर महांकाळ, शिवाजी चोपडे, मारुती बोरकर, दिलीप पाटील, दत्तात्रय गोडसे, अशोक गंगाधरे, उमा त्रिगुणे, सुवर्णा पाटील, सिंधू कोळवले, इंदुमती इमडे-जानकर, सुनीता खंकाळ यांच्यासह माजी सैनिक सुभेदार जालिंदर मोरे, सुभेदार अमोल बाबर तसेच डॉ.निकिता जितेश कोळी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button