सांगोला तालुका

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मेडशिंगी विद्यालयातील कु.आर्या सुभाष लवटे राज्यात चौथी

ऊर्जा संवर्धन पर राष्ट्रीय अभियान-२०२२ अंतर्गत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा विद्युत मंत्रालय,भारत सरकार द्वारा मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या गटातून देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय व क.महाविद्यालय मेडशिंगी प्रशालेतील इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी कुमारी आर्या सुभाष लवटे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत कु.आर्या सुभाष लवटे हिने राज्यात चतुर्थ क्रमांक मिळवून यश संपादन केले.या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!