महाराष्ट्र
नाझरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शेकापच्या सौ. निर्मला ढोबळे यांची निवड

नाझरे ता. सांगोला ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शेकापच्या सौ. निर्मला मधुकर ढोबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या अगोदरच्या उपसरपंच सौ. सुमित्रा लोहार यांनी राजीनामा दिल्याने सौ ढोबळे यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सौ अर्चना सरगर या होत्या.
नूतन उपसरपंच सौ. निर्मला ढोबळे व माजी उपसरपंच सौ. सुमित्रा लोहार यांचा सत्कार सरपंच सौ. अर्चना सरगर व माजी सरपंच सौ. मंदाकिनी सरगर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तसेच ग्रामविकास अधिकारी मंगेश पोरे यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. नूतन उपसरपंच व सरपंच तसेच सर्व सदस्य यांनी विकास कामात लक्ष घालून वसुली मोहीम राबविणे गरजेचे आहे असे मत मा. उपसभापती सुनील चौगुले यांनी व्यक्त केले. तर सोसायटीचे मा. चेअरमन सुनील बनसोडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
तर शिक्षक शिवभूषण ढोबळे यांनीही सदर निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. सरपंच हनुमंत सरगर, मधुकर ढोबळे, संजय सरगर, डॉ. विजय सरगर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, ग्राम. सदस्य प्रणाम चौगुले, गणीसो काजी, शशिकांत पाटील, मधुकर आलदर, राजू गडहिरे, विराज ढोबळे, दीपक रोकडे, विजय ढोबळे, ग्राम सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार मा. उपसरपंच प्रा. विजय गोडसे यांनी मानले.



