महाराष्ट्र

आपल्याकडे दमदाटी नाही तर कायदेशीर मार्ग असतो-आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

 

नाझरा(वार्ताहर):- नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवत असताना कोणावरही अन्याय न होता ही समस्या कशी सोडवली जाईल याचा मी विचार करत असतो. माझ्या कार्यपद्धतीत दमदाटी हा प्रकार नसतो तर कायदेशीर मार्गाचा मी अवलंब करत असतो असे प्रतिपादन सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले.

चोपडी येथील तुकाराम मंदिर सभागृहात गाव भेट दौऱ्या दरम्यान आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस दादासो बाबर, जनार्दन बाबर, जालिंदर बाबर, दत्तात्रय खळगे, संभाजी पवार, शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांनी ज्या पद्धतीने सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास केला, त्याच पद्धतीने सांगोला तालुक्यातील सर्व गावांपर्यंत विकास पोहोचवण्याचे काम मी करणार आहे.शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांच्या समस्या तसेच विविध प्रकारच्या सामाजिक समस्या स्थानिक नेते मंडळींच्या मदतीने त्या सोडवल्या जातील. कोणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय झाला तर सांगोला तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी सदैव तुमच्या सोबत असणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच सुसज्ज ग्रंथालयाची सोय केली जाणार आहे, सर्वसामान्य नागरिकांनी कधीही मला फोन करा. तुमच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा तुम्ही लाभ घ्या, त्या योजनांबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास तात्काळ गावामध्ये असणारे तलाठी, ग्रामसेवक,कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

 

यावेळी उपस्थित अपंग बांधवांची डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपुलकीने चौकशी करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी चोपडी परिसरातील ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या आमदार साहेबांसमोर मांडल्या त्यांनी त्या समस्या सोडवण्याबाबत आश्वासन दिले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button